
मुंबई – शरीरसौष्ठवपटू अनिल बिलावाने मानाचा समजला जाणारा मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबई श्री खिताब आपल्या नावावर केला आहे. त्याचबरोबर बिलावा एकाच मोसमात या दोन्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे जेतेपद उंचावणारा पहिला शरीरसौष्ठवपटू ठरला आहे. त्याच्यासोबत डॉ. मंजिरी भावसारने महिलांच्या गटात बाजी मारत ‘मिस मुंबई’ खिताब आपल्या नावे केला आहे.
अनिल बिलावाने पटकवला ‘मुंबई श्री’, तर मंजिरी भावसारने ‘मिस मुंबई’ खिताब
दोनशेहून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी मुंबईमधील परळ येथील रेल्वे वर्कशॉप मैदानात झालेल्या या स्पर्धेत भाग घेतला होता. ५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थिती लावली होती. एकूण ९ विविध वजनी गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत रोमांचक चुरस पाहण्यास मिळाली. पण अनिल याच्यावर सर्वांचे लक्ष होते. अनिलने ८० किलो वजनी गटात सहज बाजी मारली. ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ या अंतिम फेरीत त्याने सकिंद्र सिंग (८५ किलो), महेश राणे (९० किलो) आणि निलेश दगडे (९० किलोवरील) या तगड्या शरीरसौष्ठवपटूंनाही मागे टाकले. अभिषेक खेडेकर याने लक्षवेधी सादरीकरण करताना ‘बेस्ट पोझर’चा मान मिळवला. तर ७ खेळाडूंचा सहभाग असलेल्या मिस मुंबई स्पर्धेत एफएसटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली.
