
70-80च्या दशकात अभिनेते जितेंद्र आणि अभिनेत्री जयाप्रदा या जोडीने बॉलीवूडला एकापेक्षा एक असे जबरदस्त सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या दोघांनी जवळपास 20 चित्रपटात स्क्रिन शेअर केली आहे. आता भरपूर वर्षांनंतर ही जोडी आपल्याला एकत्र दिसणार आहे. पण कोण्याचित्रपटात नाहीतर ही जोडी एका रियालिटी शोच्या मंचावर एकत्र येणार आहे.
रियालिटी शोमध्ये झळकणार एकेकाळची हिट जोडी
जितेंद्र आणि जया प्रदा ही जोडी आपल्या सोनी वाहिनीवरील डान्सवर आधारित ‘सुपर डान्सर-३’ या रिअॅलिटी शोमध्ये पाहुणे म्हणून एकत्र येणार आहेत. सुपर डान्सरचे स्पर्धक या भागात त्यांच्या सुपरहिट गाण्यांवर डान्स सादर करतील. दरम्यान मी ‘सुपर डान्सर-३’ मधील बालस्पर्धकांचा डान्स पाहण्यासाठी फार उत्सुक असल्याचे जया प्रदा यांनी म्हटले आहे.
