पाकिस्तानच्या चुकीला माफी नाही… सीआरपीएफचे ट्विट

CRPF
नवी दिल्ली – गुरुवारी जम्मु-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 45 जवान शहीद झाले. त्यानंतर देशभरात एकच संतापाची लाट उसळून आली. देशातील प्रत्येक नागरिक आता यांना अद्दल घडविण्याची वेळ आल्याचे म्हणत आहे. त्यातच आता सीआरपीएफने आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत पाकिस्तानच्या चुकीला माफी नाही असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत, असे म्हटले आहे की आम्ही पाकिस्तानने केले कृत्य विसरणार नाही आणि त्यांना माफी देखील देणार नाही. त्याचबरोबर आमच्या शहीद जवांनाना आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या परिवारासोबत कायमच राहू. या हल्ल्याचा वचपा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.


गुरुवारी सायंकाळी जम्मु-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला. 80 किलो आरडीएक्स भरलेली एक कार सीआरपीएफच्या जवानांच्या बस येऊन धडकली आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात 45 जवान शहीद झाले. हा हल्ला आपण केला असल्याचे अझहर मसुदच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने म्हटले आहे.

Leave a Comment