नागराज मंजुळे यांना अमेरिकेतील प्रख्यात हॉवर्ड युनिव्हर्सिटीचे आमंत्रण

nagraj-manjule
अमेरिकेतील प्रख्यात हॉवर्ड युनिव्हर्सिटीने मराठी सिनेसृष्टीला सैराट बनविणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना एका चर्चासत्रात सहभाग घेण्यासाठी निमंत्रण धाडले असल्याची माहिती स्वतः नागराज मंजुळे यांना आपल्या फेसबुक अकाउंटवरुन दिली आहे.

नागराज मंजुळे यांना हॉवर्ड युनिव्हर्सिटीत होणाऱ्या इंडियन कॉन्फरन्स 2019 या कार्यक्रमात एका चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. नागराज यांना या चर्चासत्रात भारतीय सिने क्षेत्रातील काही दिग्गजांसोबत आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.

हे चर्चासत्र भारतातील लोकप्रिय चित्रपट जातीपातीचे कुंपण ओलांडू शकतो का? या विषयावर आधारित असून नागराजसोबत या चर्चासत्रात दक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक पी. रंजिथ, माजी मिस इंडिया निहारिका सिंग, निर्माता बोमक्कू मुरली हे सुध्दा सहभागी होणार आहेत.

Leave a Comment