
मोदी सरकारच्या डिजीटल इंडियाचा भाग असलेल्या उमंग अॅपला आता पारपत्र (पासपोर्ट) सेवेशी जोडण्यात आले आहे. या सेवेमुळे आता पारपत्र बनविण्याची प्रक्रिय अजुनच सुकर झाली आहे. तुम्ही आता उमंग अॅपच्या माध्यमातून आपल्या पासपोर्ट अर्जाची सद्यस्थिती जाणुन घेऊ शकता. त्याचबरोबर या अॅप द्वारे तुम्हाला तुमच्या परिसरातील जवळपास असलेल्या पारपत्र केंद्राची माहिती देखील मिळवू शकता. तसेच उमंग अॅपशी पासपोर्ट सेवा जोडल्या गेल्यामुळे नागरिकांना फिस कॅल्कुलेटर, डॉक्यूमेंट एडवायजर आणि पासपोर्ट सेवा केंद्र, डिस्ट्रिक्ट पासपोर्ट सेल आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राची उपलब्धता सुद्धा मिळणार आहे.
आता घर बसल्या ट्रॅक करा आपले पासपोर्ट स्टेट्स
उमंग हे अॅप केंद्र सरकारचे एकीकृत मोबाईल अॅप असून या अॅपच्या माध्यमातून सध्या १७ राज्यांच्या ६७ विभागांसहित एकूण ३३४ सेवा प्रदान करण्यात येत आहेत. ईपीएफओ, ईएसआईसी, जीवन प्रमाण, माय पॅन, एनपीएस (नेशनल पेंशन स्कीम), परिवहन सेवा-वाहन आणि आधारशी संबंधित अनेक सुविधांचा लाभ उमंग अॅपच्या मदतीन युझर घेता येणार आहे. इलेक्ट्रानिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-गवर्नन्स विभागाद्वारे हे अॅप तयार करण्यात आले आहे. उमंग अॅपला थेट गुगल प्ले-स्टोर वरुन किंवा 9718397183 या नंबरवर मिस्ड कॉल करुन डाउनलोड करता येते.
पासपोर्ट संबंधी सर्व कामे उमंग अॅपच्या व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्रालयाच्या पासपोर्ट आणि व्हिजा विभागाद्वारे लाँच करण्यात आलेल्या mpassport अॅपच्या मदतीने केले जाऊ शकतात. याच्या मदतीने घरी बसल्या पासपोर्टसाठी आवेदन केले जाऊ शकते. पण, तुम्हाला ठरवून दिलेल्या वेळेवर पासपोर्ट ऑफिसला जाऊन बायोमॅट्रिक माहिती अपडेट करावी लागणार आहे. याशिवाय या अॅपचा वापर अपॉइन्टमेंट अवेलेबिलिटी चेक करण्यासाठी पण करता येतो.
