हॅकर्सच्या निशाण्यावर तुमचे लाडके व्हॉट्सअॅप

whatsapp
सध्याच्या घडीला इन्स्टंट मॅसेजिंगसाठी ओळखले जाणारे व्हॉट्सअॅप जगभरातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहे. व्हॉट्सअॅप विना त्यांचा दिवस जाऊच शकत नाही. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या व्हॉट्सअॅपचा वापर अनेक कामांसाठी करतात. त्यातच व्हॉट्सअॅप एवढे लोकप्रिय असले तरीही असे कोणतेही सेक्युरिटी फिचर यामध्ये उपलब्ध नसल्यामुळे युझरचे अकाउंट हॅक होण्यापासून वाचवता येणार नाही.

सध्याच्या घडीला हॅकर्सच्या रडारावर व्हॉट्सअॅप असून हॅकर्सनी युझर्सला फसवण्यासाठी Kidnap scam ही योजना आखली आहे. हॅकर्स यामाध्यमातून युझर्सच्या पैशांवर डल्ला मारतात. याबाबतच्या रिपोर्टनुसार युझरची डुप्लीकेट अकाऊंट तयार करुन सर्व्हिस प्रोवायडरला कॉल करतात. ते कॉल करुन प्रोवायडरला सीम हरवल्याचे सांगतात आणि त्यानंतर त्यांना दुसरे सीम देण्यात येते. हॅकर्स असे केल्यानंतर OTP चा वापर करुन युझरचे व्हॉट्सअॅप अकाउंट ओपन करतात आणि ते हॅक करतात.

ते युझर्सच्या व्हॉट्सअॅपचा एक्सेस घेऊन त्याच्या कॉन्टॅक्ट्समधील सर्वांना मॅसेज पाठवून त्रास देतात. या मॅसेजमध्ये नमूद केले असते की युझरला किडनॅप करण्यात आले आहे आणि मोबदल्यात पैशांची मागणी करतात. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार सिंगापूरमध्ये १० लोकांनी यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत त्यांनी Kidnap scam ला बळी पडल्याचा उल्लेख केला आहे. साउथ आफ्रिकामध्येही अशा घटना घडल्याचे समजते.

हॅकर्सकडून केलेल्या या हल्ल्यापासून वाचण्यासाठी सध्याच्या घडीला कोणत्याही प्रकारचे एंटी हॅक फिचर किंवा अपडेट उपलब्ध नाही. पण एखाद्या व्हॉट्सअॅप युझरला अशा प्रकारचे मेसेज आपल्या नातेवाईकाकडून किंवा मित्राकडून आल्यास त्या नातेवाईकाला फोन करुन त्याची योग्य ती माहिती घ्यावी.

Leave a Comment