केस गोठविण्याची अनोखी स्पर्धा

compition
पर्यटकांचे आकर्षण वाढावे यासाठी कॅनडामधील युकोन येथे एक वेगळीच स्पर्धा २०११ पासून आयोजित केली जात असून या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद वाढत चालला आहे. इंटरनॅशनल हेअर फ्रीझिंग कॉन्टेस्ट असे या स्पर्धेचे नाव आहे. दरवर्षी फेब्रुवारी मार्च मध्ये हि स्पर्धा होते पण त्यासाठी तापमान उणे ४ अंश असणे आवश्यक असल्याने स्पर्धेच्या तारखा ऐनवेळी जाहीर केल्या जातात.

सोर्डो रेंजव्हस या वार्षिक उत्सवाचा भाग म्हणून ही स्पर्धा घेतली जाते. यात स्पर्धकांनी गरम पाण्याचे झरे अथवा गरम पाण्याच्या पूल मध्ये स्नान करायचे आणि त्यांचे केस फ्रीज करायचे. म्हणजे गरम पाण्याच्या झर्यात अथवा पूल मध्ये बुडी मारली आणि डोके वर काढले की बाहेर असलेल्या प्रचंड थंडीमुळे केस गोठतात. बाहेरचे तापमान किमान उणे ४ डिग्री असेल तरच हे घडते. केस गोठले की कुणाचे केस अधिक आकर्षक रीतीने गोठले गेले आहेत याची परीक्षा करून बक्षिसे दिली जातात.

या स्पर्धेत महिला, पुरुष, ग्रुप आणि सर्वाधिक रचनात्मक अश्या चार ग्रुप मध्ये बक्षिसे दिली जातात. विजेत्यांना ७५० डॉलर्स मिळतात आणि ताहिनी पुलाचे सदस्यत्व दिले जाते. गोठलेले हे केस पुन्हा गरम पाण्यात बुडी मारली कि मूळ पदाला येतात.