अधिक मुले जन्माला घालणाऱ्या महिलांवर सवलतीचा वर्षाव

hungery
हंगेरी या युरोपीय देशात घटती लोकसंख्या आणि वाढत चाललेले स्थलांतरितांचे प्रमाण यामुळे काळजीत पडलेल्या पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन यांनी नवी योजना जाहीर केली असून त्यात महिलांवर सवलतींचा वर्षाव केला गेला आहे.

पंतप्रधान ओर्बन यांनी राष्ट्राला उद्देशून नुकत्याच केलेल्या भाषणात ४० वर्षापेक्षा कमी वयाच्या महिलांना पहिले लग्न करण्यासाठी बिनव्याजी २५ लाख कर्ज देऊ केले असून त्यांनी तिसरे मुल जन्माला घातले की हे कर्ज माफ होणार आहे. ज्या महिलेला ४ पेक्षा अधिक मुले होतील त्यांना जन्मभर आयकरातून सूट दिली जाणार आहे तसेच ३ अथवा अधिक मुले असणाऱ्या जोडप्याला ७ सिटर कार घेण्यासाठी ६ लाखाची मदत केली जाणार आहे.

पंतप्रधान म्हणाले, स्थलांतरित लोकांवरचे अवलंबित्व कमी करणे आणि देशाचे भविष्य सुरक्षित करणे यासाठी हाच एक पर्याय आहे. मुस्लीम देशातील स्थलांतरिताना प्रवेश देण्यापेक्षा हन्गेरिअन लोकांनी अधिक मुले जन्माला घालावीत हे केव्हाही चांगले. आम्हाला केवळ लोकसंख्या वाढ नको तर हन्गेरिअन मुले हवीत. हंगेरीची लोकसंख्या ९७.८ लाख असून दरवर्षी ती ३२ हजाराने घटत चालली आहे.

ओर्बन यांचे भाषण सुरु असताना बुडापेस्ट मध्ये या भाषणाला विरोध करण्यासाठी हजारो लोक एकत्र जमले होते असेही समजते.

Leave a Comment