अत्यंत दुर्मिळ माशाच्या दर्शनाने जपानमधील नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण

fish

जपानमध्ये सध्याच्या काळात अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा ‘ओअरफिश’ प्रजातीचा मासा वारंवार पाहिला जात असून त्यामुळे जपानी नागरिकांमध्ये काहीसे अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. या दुर्मिळ माशाचे दर्शन होणे कोणत्या तरी नैसर्गिक विपदेचे सूचक असल्याची मान्यता येथे रूढ आहे. समुद्रामध्ये अतिशय खोल पाण्यामध्ये राहणारा हा मासा समुद्र किनाऱ्याच्या जवळ दिसू लागला, तर लवकरच भूकंप किंवा सुनामी येणार असल्याचा हा संकेत असल्याचे म्हटले जाते.

 

View this post on Instagram

 

#うおすいレア生物 #またまた❗️ #リュウグウノツカイ 昨日、魚津市経田の海岸でリュウグウノツカイが打ち上げられているのが発見されました❗️全長は323cm。 富山湾では今年度5例目です。 あいにく今回発見されたものは 鳥につつかれ損傷が激しかったので、解剖などを行い研究用にしました。 前回獲れたリュウグウノツカイは 2/2(土)と2/3(日)の2日間限定で展示しますよ⤴⤴ 全長394.8cm。 今回はタッチOK🙆‍♂️ 深海魚ファンは見逃せませんよね〜🙌🙌 #幻の魚 #oarfish #deepsea #nature #beautiful #魚 #珍魚 #さかな #魚津水族館公式 #魚津水族館 #水族館 #富山 #uozuaquarium #aquarium #uozuaquariumofficial #限定 #レア #魚津 #経田 #背ビレ腹ビレ美しい #花魁

A post shared by 魚津水族館 公式 (@uozuaquarium_official) on

शुक्रवारी टोयामा प्रांतामध्ये मासेमारी साठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये दोन ओअरफिश अडकलेले आढळल्याने जनतेमध्ये काळजीचे वातावरण आहे. या पूर्वी काही दिवस आधी आणखी चार ओअरफिश किनाऱ्यालगत आढळले असून ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधी आढळून आलेल्या चार ओअरफिश पैकी सुमारे ३.२ मीटर लांबीचा एक ओअरफिश टोयामा बे च्या किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला होता, तर इमिझू बंदरावर मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमाराच्या जाळ्यामध्ये आणखी एक ओअरफिश आढळला होता.

अत्यंत दुर्मिळ असलेली ही ओअरफिश प्रजाती समुद्रामध्ये सामान्यतः दोनशे ते एक हजार मीटर खोल पाण्यामध्ये आढळते. यांची कातडी चंदेरी रंगाची असून, यांचे कल्ले (फिन्स) लाल रंगाचे असतात. जपानी भाषेमध्ये ‘रयुगूनो त्सुकाई’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ओअरफिशच्या जपानी नावाचा अर्थ ‘समुद्रदेवतेचे दूत’ असा असून, समुद्रामध्ये येणाऱ्या भूकंपांची सूचना देण्यासाठी एरव्ही खोल पाण्यामध्ये राहणारे हे मासे समुद्राच्या किनाऱ्याजवळ येत असल्याची मान्यता येथे रूढ आहे.

या मान्यतेला कोणताही शास्त्रीय आधार नसला, तरी ही मान्यता संपूर्णपणे चुकीची नसल्याचे वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे. मात्र एरव्ही पाण्यामध्ये खोलवर राहणारे हे मासे केवळ संभाव्य भूकंपाचे सूचक म्हणून किनाऱ्याजवळ आढळण्याशिवाय, ग्लोबल वॉर्मिंग हे ही त्यामागील कारण असू शकते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. २०११ साली जपानमध्ये आलेल्या भयानक सुनामीमध्ये सुमारे वीस हजार लोक मरण पावले होते. फुकुशिमामध्ये आलेल्या भूकंपाच्या परिणामस्वरूप हे सुनामीचे संकट ओढविले होते. हा भूकंप झाल्याच्या काही काळ आधी, अनेक ओअरफिश सागरकिनाऱ्यावर मृतावस्थेत आढळले होते.

Leave a Comment