
मुंबई – विदर्भ क्रिकेट असोसिएशनने आणि बीसीसीआयने सलग दुसऱ्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भाला त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी रोख रकमेचे इनाम घोषित केले आहे. त्यानुसार क्रिकेट असोसिएशनने ३ तर बीसीसीआयने विदर्भासाठी २ कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.
रणजी विजेता विदर्भ संघाला 5 कोटींचे इनाम
विदर्भाने अंतिम फेरीत सौराष्ट्रावर ७८ धावांनी मात करत सलग दुसऱ्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विदर्भाने पहिल्या हंगामात दिल्लीवर मात करुन आपले पहिले विजेतेपद मिळवले होते. रणजीनंतर विदर्भाच्या संघासमोर आता इराणी करंडकाचे आव्हान असणार आहे.
