
यावर्षी एप्रिलमध्ये करण जोहरचा ‘कलंक’ चित्रपट रिलीज होणार आहे. त्यानुसार करण जोहर लवकरच आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे. यात आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित आणि संजय दत्तसह इतर कलाकार आहेत.
‘कलंक’ साठी आलियाने घेतले एवढे मानधन
या चित्रपटाबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटात इतरही मोठे कलाकार असून यात आलियाला सर्वात जास्त मानधन मिळणार आहे. तिला यासाठी जवळजवळ 10 कोटी रुपये मानधन दिले आहे. आलिया आजच्या काळातील शायनिंग स्टार आहे. विशेष म्हणजे ‘राजी’मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करून ती प्रेक्षकांना आकर्षित करू शकते, हे तिने सिद्ध केले.
आलियाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर ती सध्या गली बॉयच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये तिच्यासोबत रणवीर सिंह आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. यासोबतच ती रणबीर कपूरसोबत ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटातही झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे.
