बायकोने जेवणाचे अर्धे बिल न दिल्याने पतीराजांचे पोलिसांना पाचारण

police
पती-पत्नींमध्ये वादविवाद, मतभेद हे प्रत्येक घरामध्येच होत असतात. अनेकदा या वादाचे कारण अतिशय क्षुल्लकही असते. पण शब्दाला शब्द वाढतो, आणि सगळाच मामला बिनसतो. अशीच काहीशी घटना ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा मध्ये घडली. येथे एका दामप्त्यामधले वाद इतके विकोपाला गेले, की रागाच्या भरात पतीराजांनी चक्क पोलिसांना पाचारण केले. वाद विकोपाला गेले हे खरेच, पण या वादामागचे कारण कळल्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्यांना हसावे की रडावे हे समजेनासे झाले.
police2
झाले असे, की हे दाम्पत्य जेवणासाठी एका चायनीज रेस्टॉरंटअंधे गेले असता, त्यांनी जेवण मागविले. जेवण व्यवस्थित पारही पडले. मात्र जेवणाचे बिल देताना वादाला तोंड फुटले. वाढता वाढता वाद इतका वाढल, की पतीने चिडून जाऊन आपल्या पत्नीची तक्रार पोलिसांकडे नोंदविली. सर्व प्रकार नेमका आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी जेव्हा पोलीस या चायनीज रेस्टॉरंटमध्ये पोहोचले, तेव्हा वादाचे कारण ऐकून ते ही बुचकळ्यात पडले.
police3
या पतीमहाशयांनी, त्यांच्या पत्नीने जेवण झाल्यांनतर जेवणाचे अर्धे बिल भरण्यास नकार दिल्यामुळे पती-पत्नींमध्ये वाद सुरु झाल्याचे पोलिसांना सांगितले. पत्नीने सर्व पदार्थ स्वतःच्या आवडीचे मागाविल्यामुळे आधीच नाराज झालेल्या पतीने, जेवणाचे अर्धे बिल पत्नीने भरावे असा हट्ट धरला. तर जेवणाचे पूर्ण बिल पतीने भरावे असे पत्नीचे मत होते. यावरून वाद सुरु झाले आणि पतीने रागाच्या भरात चक्क पोलिसांना पाचारण केले.
police4
पोलिसांनी देखील या दाम्पत्याला वाद मिटविण्याबद्दल समजावले, पण दोघांपैकी कोणीच माघार घेण्यास तयार नसल्याने सार्वजनिक ठिकाणी अशांती फैलाविण्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी या दाम्पत्याला ताब्यात घेतल्याचे समजते. दरम्यान रेस्टॉरंटमध्ये आलेल्या इतर ग्राहकांचे मात्र या सर्व प्रकारामुळे भरपूर मनोरंजन झाले.

Leave a Comment