
एका चक्रम कलाकाराने उद्ध्वस्त कलाकृती परत जोडून प्रदर्शनासाठी मांडण्यात आली आहे. या कलाकृतीला लिलावात दहा लाख पौंडांची किंमत मिळाली होती आणि ती उद्ध्वस्त केल्यामुळे संपूर्ण कलाजगताला धक्का बसला होता.
तुकडे-तुकडे झालेली 10 कोटींची चित्रकृती पुन्हा प्रदर्शनात!
बँक्सी नावाच्या या कलाकाराच्या ‘गर्ल विथ बलून’ ही कलाकृती गेल्या ऑक्टोबरमध्ये सोथबी या संस्थेने लिलावात काढली होती. त्यावेळी या कलाकृतीला 10 लाख 42 हजार पौंड (10 कोटी 08 लाख 79 हजार080 रुपये) एवढी किंमत मिळाली होती. त्यानंतर काही वेळातच या चित्राच्या चौकटीत लपविलेल्या श्रेडरमधून तिचे तुकडे-तुकडे झाले. एखाद्या चित्राचा लिलाव झाल्यानंतर काही क्षणात त्याच्या चिंध्या होण्याची ही कलाजगतातील पहिलीच घटना आहे, असे त्यावेळी सोथबीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले होते.
संशोधन उध्वस्त झालेले हे चित्र मंगळवारी जर्मनीतील बाडेन बाडेन या शहराती फ्रिएडर बुर्डा संग्रहालयात प्रदर्शित करीत आहे. हे चित्र प्रदर्शित करणारी पहिली संस्था होण्यासाठी तीव्र स्पर्धा होती. त्यात आम्ही विजयी ठरलो, असे या संग्रहालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या चित्रात लपविलेले श्रेडर आणि बॅटरी काढून टाकली आणि मगच हे चित्र संग्रहालयात प्रदर्शनासाठी लावले, असे या संग्रहालयाची संचालक हेनिंग शेपर यांनी पत्रकारांना सांगितले.
