पूनम महाजन यांच्या “अरे”ला राष्ट्रवादीचे “कारे”ने उत्तर

poonam-mahajan
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष आणि भाजप खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात ठिकठिकाणी पोस्टर लावले असून या पोस्टरवर अहो चिऊ ताई… महाभारत, रामायण यांचे कथानक राहू द्या, देश की जनता यह जानना चाहती हैं प्रविण ने प्रमोद को क्यों मारा? असा मजकूर लिहिलेले आहे. हे पोस्टर मुंबईतील रस्त्यारस्त्यावर लावले आहेत.

पूनम महाजन यांनी मुंबईत सोमय्या मैदानावर 3 फेब्रुवारी रोजी आयोजित भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासोबत केली होती. यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पूनम महाजन यांच्यावर टीका करताना पोस्टर लावून, प्रविण महाजन यांनी प्रमोद महाजन यांना का मारले?, असा प्रश्न विचारला आहे.

Leave a Comment