लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला १९८३साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित ‘८३’ हा चित्रपट येणार आहे. पुन्हा एकदा पडद्यावर त्यावेळी नेमके काय झाले होते हे पाहायला मिळणार आहे. रणवीर सिंग या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. १९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचे संदिप पाटील हे देखील एक भाग होते. त्यामुळे या चित्रपटातील त्यांची भूमिका त्यांचाच मुलगा चिराग पाटील याच्या वाट्याला आली आहे. चिराग ३६ वर्षानंतर आपल्या वडिलांचीच भूमिका या चित्रपटात साकारणार आहे.
Chirag Patil, son of cricketer #SandeepPatil, will play his father in #83TheFilm… Stars Ranveer Singh as #KapilDev… Directed by Kabir Khan… Presented by Reliance Entertainment… Produced by Madhu Mantena, Vishnu Induri and Kabir Khan… #CastOf83 #Relive83 pic.twitter.com/L0FBq171FM
— taran adarsh (@taran_adarsh) February 4, 2019
आत्तापर्यंत ११ मराठी चित्रपट आणि काही हिंदी चित्रपटात चिरागने भूमिका साकारल्या आहेत. माझ्याच वडिलांची भूमिका ‘८३’ चित्रपटात साकारायला मिळणार असल्यामुळे प्रचंड उत्सुक असल्याचे त्याने एका माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. वर्ल्डकप दरम्यान वेस्ट इंडीज विरोधातील सामन्यात संदिप पाटील यांनी दमदार फलंदाजी केली होती. आता त्यांची हिच भूमिका चिराग साकारताना दिसणार आहे.
रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील एका सिनचा फोटोही रणवीरने शेअर केला होता. पंजाबी अभिनेता ऐमी विर्क, तमिळ अभिनेता जिवा, अभिनेता सनी कौशल, ताहीर राज भसीन, हार्डी संधू आणि पंकज त्रिपाठी हे कलाकारही या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहेत.