झोप न घेता महिलाने केला व्यायाम आणि गमवावा लागला जीव

brainhaemorrhage
व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, मात्र व्यायामाचा अतिरेक हा जीवावर ही बेतु शकतो. अशीच एक घटना यूकेमध्ये राहणाऱ्या एका महिला सोबत घडली आहे. ही महिला टीव्ही पाहताना व्यायाम करत होती, पण काही काळानंतर ती अचानक खाली पडली. तिला रुग्णालयात दाखल केले मात्र तिचा मृत्यु झाला. तिच्या मृत्यू मागील कारण आश्चर्यकारक होते.
brainhaemorrhage2
माध्यमांच्या अहवालानुसार, यूकेच्या नॉर्थवेल्स मध्ये राहणारी जोना लीच (46) ही महिला तिचे पती जस्टिन बेलिन्सन आणि तीन मुले फरा (21), जॉर्जिया (20) आणि जेनसेन (18) यांच्या सोबत राहत होती.
brainhaemorrhage1
घटनेच्या दिवशी जोना लीच ही नाइट शिफ्ट करुन घरी आली होती. मात्र झोप न आल्यामुळे तिने व्यायाम केला. जोना लीच टीव्ही पाहत व्यायाम मशीनवर व्यायाम करीत होती. त्यावेळी अचानक ती बेशुद्ध पडली, त्यानंतर तिच्या पती जस्टिन बेलिन्सने जोनाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला मात्र तिचा मृत्यू झाला होता.
brainhaemorrhage3
डॉक्टरांच्या मते, जोनाचा मृत्यू ब्रेन हेमरेजमुळे झाला आहे. जोना नाइट शिफ्ट करुन आली होती आणि झोप न घेताच व्यायाम केला. त्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment