‘लुका छुपी’मधील आणखी एक गाणे तुमच्या भेटीला

luka-chuppi
आगामी ‘लुका छुपी’ चित्रपटात कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आणि क्रिती यांच्या रोमँटिक कॉमेडीमध्ये त्यांच्या लग्नाची मनोरंजक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आता या चित्रपटातील ‘कोका कोला तू’ हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

या गाण्याची लिंक ट्विटरवर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शेअर केली आहे. क्रिती सेनॉन आणि कार्तिक आर्यनचा धमाल डान्स ‘कोका कोला तू’ असे शीर्षक असलेल्या या गाण्यात पाहायला मिळत आहे. हे एक पार्टी साँग असून गाण्याला नेहा कक्कर, तनिष्क बागची आणि टोनी कक्कर यांनी आवाज दिला आहे. कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनशिवाय ‘लुका छुपी’ चित्रपटात पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराणा आणि विनय पाठक यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटातील या गाण्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.