
मुंबई – सातारा पोलिसांनी पंकज कुंभार या युवकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा दौ-यादरम्यान जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबईतील आग्रीपाडा परिसरातून अटक करण्यात आली असून प्रथमदर्शनी तपासात हा युवक मनोरुग्ण असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांना फेसबुक पोस्टद्वारे जीवे मारण्याची धमकी देणारा युवक ताब्यात
४ फेब्रुवारीला सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांसह ४० हजार लोकांना मारण्याची धमकी पंकज कुंभार या युवकाने त्याच्या फेसबुक वॉलवर दिल्यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून तपासाला लागली होती. आग्रीपाडा पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेऊन सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
