सावधान! ‘हा’ व्हायरस तुमच्या क्रेडिट कार्डची माहिती करु शकतो हॅक !

card
सॅन फ्रान्सिस्को – ग्लोबल सायबर सुरक्षा कंपनी (Global Cyber Security) पालो आल्टोने एक व्हायरस शोधून काढला आहे. या व्हायरसमुळे गूगल क्रोममध्ये , पासवर्ड सेव्ह केलेल्यांची माहिती आणि लॉगइन आयडी हॅक केला जाऊ शकते.

यावेळी अधिक माहिती देताना, पालो अल्टो नेटवर्कने सांगितले आहे की, कूकीमायनर असे या व्हायरसचे नाव आहे. हा व्हायरस इतका धोकादायक आहे की ब्राऊजर कुकीज आणि वॉलेट सर्विसच्या वेबसाईटचा डेटा ही हॅक करू शकतो. तसेच मॅकचा बॅकअप घेणाऱ्यांचे टेक्स्ट मेसेजही हॅक केले जात आहेत. यातील लॉग इनची माहिती चोरली जाऊ शकते. त्यामुळे आपल्या ऑनलाईन व्यवहारांचे डिटेल्स हॅकर्सला मिळू शकतात. त्यामुळे बँक खाते, क्रेडिट कार्डचा दुरूपयोग केला जाऊ शकतो.

जेव्हा आपण एखाद्या वेबसाईटला लॉग इन करतो तेव्हा त्याच्या कुकीज सर्वरला सेव्ह होतात. हॅकर्स त्याच्यावर हल्ला करून लॉगइनची माहिती मिळवतात.

Leave a Comment