दीपिकासाठी रणवीरची भावनिक पोस्ट

deepvveer
मागील वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्री दीपिका आणि रणवीर सिंग हे जोडपे विवाहबद्ध झाल्यानंतर हे जोडपे कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत आहे. रणवीर लग्नानंतर प्रत्येक ठिकाणी दीपिकाचे कौतुक करणे विसरलेला नाही. आता हे जोडपे आणखी एका गोष्टीमुळे कपल चर्चेत आले आहे. आता ३ महिन्यांचा कालावधी त्यांच्या लग्नाला उलटला आहे. रणवीरने दीपिकासाठी लग्नाच्या ३ महिन्यानंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

आपल्या वाढदिवशी दीपिकाने तिची वेबसाईट लॉन्च केली होती. रणवीर सिंगचा या वेबसाईटवरचा संदेश सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने या पोस्टमध्ये दीपिकाचे भरभरुन कौतुक केले आहे.


त्याने या पोस्टमध्ये, दीपिका अतिशय चांगली व्यक्ती असून आता ती माझी अर्धांग्नी आहे, म्हणून मी हे सर्व नाही लिहित आहे. पण मी तिला वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमध्ये खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. मी जगातील सर्वाधिक नशिबवान पती आहे. तिने मला चांगला पुरूष बनण्यासाठी प्रेरित केले. ती माझ्या आयुष्याचा प्रकाश आहे, असल्याचे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर रणवीरची ही पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स दिल्या आहेत.

Leave a Comment