
मागील वर्षी अनेक स्टार किड्सने बॉलीवुडमध्ये प्रवेश केला हे काही आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. आता या वर्षीदेखील अनेक स्टार किड्स बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे. लवकरच गोविंदाचा मुलगा यशवर्धन देखील बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार असून त्याने यासाठी अॅक्टिंगचे धडेही गिरवण्यास सुरुवात केली आहे.
आणखी एक स्टारकिड बॉलीवूडमध्ये करणार एंट्री
एकेकाळी बॉलिवूडमध्ये गोविंदाने दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याचे काही चित्रपट मध्यंतरी प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, या चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता बॉलिवूडमध्ये त्याचा मुलगा यशवर्धनला लॉन्च करण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. यशवर्धनच्या बॉलिवूड डेब्यूची तयारी मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. पापा गोविंदासोबत तो अनेकदा दिसला. सोशल मीडियावरही अलीकडच्या काळात तो प्रचंड अॅक्टिव्ह झाला आहे.
निर्माता साजिद नाडियाडवालाच्या बॅनरखाली फिल्म मेकिंगचे धडे यशवर्धन गिरवत असल्याचे वृत्त होते. तो तेव्हा प्रॉडक्शन डिपार्टमेंटचे काम शिकत असल्याचेही सांगितले गेले होते. यानंतर अचानक यशवर्धन अॅक्टिंगमध्येही पदार्पण करणार असल्याच्या चर्चा झाल्या.
