आयुष शर्मा लागला ‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकच्या तयारीला

aayush-sharma
‘लव्हयात्री’ चित्रपटाद्वारे सलमानची बहिण अर्पिता खानचा पती आयुष शर्माने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण म्हणावे तसे यश त्याच्या पहिल्या चित्रपटाला मिळाले नाही. आयुष त्यानंतर आता आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे.

आयुष शर्मा हा प्रविण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. तो या चित्रपटाच्या मागणीनुसार मराठी शिकण्याची गरज असल्याने सध्या मराठीचे धडे घेत आहे. मुळशी तालुक्यातील गुन्हेगारी जगतावर भाष्य करणाऱ्या विषयावर हा चित्रपट आधारित आहे.

मी मराठी शिकण्यासाठी अनेक व्हिडिओ पाहत आहे. यासोबत मराठी पुस्तक वाचण्याचा प्रयत्नही करत असल्याचे आयुषने म्हटले आहे. त्याचबरोबर मराठी ही खूप सुंदर भाषा असून मला पहिल्यापासूनच ती शिकण्याची इच्छा होती. माझ्या स्टाफमधील काही मराठी लोकांसोबतही मी सध्या मराठी बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचेही आयुषने म्हटले आहे.

Leave a Comment