
बॉक्स ऑफिसवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरु असून पहिल्या आठवड्यात नवाजुद्दीन प्रमुख भूमिकेत असलेल्या ठाकरे चित्रपटाने तब्बल ३१.६० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत जवळपास २३ कोटींची कमाई केली होती. हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांत ठाकरे चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.
पहिल्या आठवड्यात ‘ठाकरे’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमावले एवढे कोटी
रिलीज झाल्यानंतर ठाकरे चित्रपटाने पहिल्याच दिवशी सहा कोटींची तर दुसऱ्या दिवशी १० कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी ६.९० कोटींची कमाई केल्यानंतर तीन दिवसांत आकडा २३ कोटींवर पोहोचला होता. कंगनाचा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ चित्रपट ठाकरे चित्रपटासोबत प्रदर्शित झाला आहे. ठाकरे चित्रपटाच्या कमाईवर मणिकर्णिकामुळे परिणाम होईल अशी शंका व्यक्त केली जात होती. पण आपला प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत आणण्यात ठाकरे चित्रपट यशस्वी ठरला आहे.
हिंदी, तामिळ आणि तेलुगू तीन भाषांत कंगनाचा ‘मणिकर्णिका’ रिलीज करण्यात आला असून ३ हजार स्क्रीनवर प्रदर्शित झाला. तर ‘ठाकरे’ २ हजारपेक्षा अधिक स्क्रीनवर दाखविण्यात आला. पाच दिवसांत मणिकर्णिकाने ५० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.
