‘जग्गू दादा’ नावाने ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा आज (१ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. जॅकी श्रॉफ यांनी ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. सध्या जॅकी श्रॉफ चित्रपटाच्या शुटिंग मध्ये व्यस्त आहे. चला जॅकी श्रॉफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचे काही दुर्मिळ फोटो पाहुयात.
जॅकी श्रॉफ यांचे पूर्ण नाव जयकिशन काकुभाई श्रॉफ असे आहे. महाराष्ट्रातील लातूर येथील उदगीर येथे त्याचा जन्म झाला.
जॅकी श्रॉफ यांचे वडील काकुभाई हरिभाऊ श्रॉफ गुजराती होते. तर आई तुर्कस्थानी होती. या फोटोत जॅकी त्याच्या आई-वडिलांसोबत आहे.
जॅकी श्रॉफ त्याच्या आईवडिलांसोबत मुंबईमध्ये मलबार हिल एरियामध्ये तीन बत्ती भागात राहत होता. हा फोटो त्याच चाळीतला आहे.
हा फोटो जॅकी श्रॉफ यांच्या आईसोबतचा आहे.
अभिनयाची कारकिर्दीत प्रसिद्धीच्या शिखरावर असताना जॅकी श्रॉफ हे आयशा दत्त हिच्या प्रेमात पडले. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 5 जून 1987 रोजी जॅकी व आयशा विवाहबंधनात अडकले. आयशा लग्नानंतर चित्रपट निमार्ती बनली.
जॅकीला दोन मुले आहेत. एक बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि मुलगी कृष्णा.