विशाल दादलानीने का म्हटले धडधडीत खोटे बोलत आहेत मोदी?

vishal-dadalani
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशात बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला तातडीने फाशी दिली जात असल्याचे म्हणाले होते. त्यावर गायक संगीतकार विशाल दादलानीने असे विधान करणारे पंतप्रधान धडधडीत खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.

मोदी म्हणाले होते, या देशात या अगोदरदेखील बलात्कार होत होते, आम्हाला अशा प्रकरणाबद्दल ऐकताना आजही लाज वाटते. या बलात्काऱ्यांना आज ३ दिवसात, ७ दिवसात, ११ दिवसात आणि महिन्याभरात फासावर लटकविले जाते. मुलींना न्याय देण्यासाठी ही अशी पावले नेहमी उचलली जात आहेत आणि हा परिणाम म्हणजेच पुरावा आहे.


या म्हणण्याला मोदी आणि बीजेपीवर टीका करणाऱ्या दादलानी यांनी आक्षेप घेत हे खोटे असल्याचे म्हटले आहे. दादलानीने म्हटले आहे की, खोटे. सर, तुमच्या कारकिर्दीत फासावर लटकवलेल्या एका बलात्काऱ्याचे नाव द्या. निर्भयाचा बलात्कारी, असिफाचा बलात्कारी, एवढेच नाही तर उना येथे चिमुरडीवर बलात्कार करणारा बीजेपी आमदार सेनगर अजूनही जीवंत आणि मजेत आहे. नरेंद्र मोदीजी, आम्हाला माहित आहे की निवडणुका जवळ आल्या आहेत, परंतु भारतीय महिला आणि मुलींच्या वेदना प्रचारात बदलू नका., असेही दादलानीने पुढे म्हटले आहे.

Leave a Comment