
मुंबई – मराठी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते दिनेश साळवी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. बुधवारी रात्री मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकात त्यांना छातीत दुखू लागले. आसपासच्या नागरिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मराठी अभिनेते दिनेश साळवी यांचे निधन
दिनेश साळवी यांच्या निधनाने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. सीआयडीसह अनेक मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केले होते.
लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक अशी दिनेश साळवी यांची ओळख होती. त्यांनी कॉलेजमधील बऱ्याच एकांकिका बसवल्या होत्या.
