न्यायालयाच्या निर्णयांना राजकीय रंग देण्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना ठणकावले

supreme-court
नवी दिल्ली – वकिलांच्या एका गटाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णर्यांवरून न्यायाधीशांवर टीका करणे आणि सरकारच्या बाजूने आलेल्या काही निर्णयांना राजकीय रंग देण्याच्या प्रयत्नाला सर्वोच्च न्यायालयाने उत्तर दिले असून न्यायालयाचा हा अवमान असल्याचे म्हटले असून संस्थेची प्रतिष्ठा कायम राखण्याची जबाबदारी न्यायाधीशांवर आहे. माध्यमांकडे जाऊन न्यायाधीश आपली बाजू किंवा विचार मांडू शकत नाहीत. न्या. मिश्रांबाबत खटल्यांच्या वाटपावरून आणि काही निर्णयांवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. न्यायालयाने या पार्श्वभूमीवर वकिलांना ठणकावले.

वकिलांच्या एका गटाला न्या. विनीत शरण आणि न्या. अरूण मिश्रा यांच्या घटनापीठाने फटकारले. हा सर्व प्रकार सवंग लोकप्रियेतसाठी असून बार कौन्सिलपेक्षाही ते स्वत:ला मोठे असल्याचे मानतात, असे न्यायालयाने म्हटले. एका निर्णयावेळी पीठाने म्हटले की, न्यायाधीशांवर माध्यमांत जाऊन वैयक्तिक हल्ले करणे ही बारच्या काही सदस्यांसाठी ही अत्यंत साधारण गोष्ट झाली आहे. यावरून जनतेमध्ये न्यायपालिकेवरून अविश्वास पसरतो आणि न्यायपालिकेच्या प्रतिमेला धक्का पोहोचतो.

Leave a Comment