
उद्या म्हणजेच १ फेब्रुवारीला सोनम कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. सोनम कपूर आणि अनिल कपूर ही बाप-लेकीची जोडी या चित्रपटात प्रथमच एकत्र काम केले आहे.
‘एक लडकी को….’ सोनमचे समलैंगिक संबंध !
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. पण चित्रपटाचा रिलीजच्या अगदी तोंडावर हा सस्पेन्सही संपला आहे, कारण काल या चित्रपटाचे एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आणि या पोस्टर वरुन हा चित्रपट समलैंगिक नात्यावर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे.
सोनम कपूर पहिल्यांदा पडद्यावर हिरोसोबत नाही तर हिरोईनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आहे. पण सोनमचा लव्ह इंटरेस्ट राजकुमार नाही तर एक मुलगी आहे. ट्रेलरमध्ये या मुलीची एक झलक दिसली होती. या हिरोईनचे नाव रेजीना कंसाड्रा आहे. रेजीना कंसाड्रा साऊथ इंडस्ट्रीतील हिरोईन आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’द्वारे ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.
