२१ फेब्रुवारीला अयोध्येत साधू-संत राम मंदिराचे निर्माणकार्य सुरू करणार

dharma-sansad
प्रयागराज – राम मंदिराबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय कुंभमेळ्यात जमलेल्या परम धर्मसंसदेच्या साधूंनी घेतला असून अयोध्येत येत्या २१ फेब्रुवारीपासून साधू-संत राम मंदिराचे निर्माणकार्य सुरू करतील, असा प्रस्ताव धर्मसंसदेत मंजूर झाला. मागील अनेक वर्षापासून कानी ‘रामलला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे’, ही घोषणा पडत आहे. साधू-संतांनी घेतलेल्या निर्णयानंतर ही घोषणा ऐकायला मिळाली. सर्वांसमोर संतांच्या या निर्णयामुळे पेच निर्माण झाला आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात अनेक आंदोलने राम मंदिर निर्माण करण्यासाठी झाली. देशात मागील ९० वर्षांपासून धार्मिक उन्माद सुरू आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने याचिका दाखल करून, वादात नसलेली जागा परत करण्याची मागणी केली. तर धर्मसंसदेने शिलान्यास करणार असल्याचा ठराव मंजूर करून घेतल्यामुळे पुन्हा राम मंदिर प्रकरणावरून वाद निर्माण होऊ शकतो.

राम मंदिर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिलान्यास करण्याची योजना निकाल येण्यापूर्वीच आखली जात असून, न्यायालयावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप होत आहे. वादात नसलेली जागा परत करण्याची मागणी करून हा विषय तापविण्याचा केंद्र सरकारचा हेतू असू शकतो. यातून राजकीय हित साधले जाऊ शकते. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही या याचिकेचे समर्थन केले. जनतेला भासवण्यासाठी राम मंदिराचे निर्माणकार्य सुरू असल्याचा देखावा केला जात आहे, असा आरोप होत आहे.

Leave a Comment