कंगनासोबतचे सगळे मतभेद, वाद विसरून काम करण्यास करण तयार

karan-johar
आज देशभर कंगना राणावतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ प्रदर्शित झाला आणि दुसरीकडे कंगनासाठी एक मोठी बातमी आली. करण जोहरने ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’च्या रिलीजदरम्यान कंगनापुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. करण सगळे मतभेद, वाद विसरून कंगनासोबत काम करण्यास तयार झाला आहे.

करण अलीकडे एका मुलाखतीत कंगनाबद्दल बोलला. मला कंगनासोबत काम करण्यास काहीही अडचण नाही. तिच्यासोबत काम करायला मला आवडेल. मी आत्तापर्यंत जितके काही चित्रपट दिग्दर्शित केले, त्यात कंगनालायक भूमिका नव्हती. उरली गोष्ट मी निर्मिती केलेल्या चित्रपटाची. तर आजपर्यंत कुण्याही दिग्दर्शकाने माझ्याकडे या चित्रपटांसाठी कंगनाचे नाव पुढे न केल्यामुळे माझ्या चित्रपटांत कंगना दिसली नाही. आमच्यात मतभेद आहेत, याचा अर्थ आम्ही एकमेकांसोबत काम करणार असा नाही, असे करण यावेळी म्हणाला.

Leave a Comment