
पुढील महिन्यात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध होणार आहे. सौंदर्या फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक आणि अभिनेता विशागन वनानगामुडी याच्यासोबत लग्न करणार आहे. हा विवाहसोहळा चेन्नईमध्ये संपन्न होणार असून रजनीकांत यांच्या कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.
पुन्हा एकदा विवाहबद्ध होणार रजनीकांत यांची कन्या
सौंदर्या घटस्फोटीत असून तिला पाच वर्षांचा मुलगा देखील आहे. सौंदर्याने २०१० मध्ये चेन्नईस्थित व्यावसायिक अश्विन याच्यासोबत लग्न केले होते. पण या दोघांच्या वैवाहिक जीवनात वारंवार खटके उडत असल्याने तिने २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. सौंदर्याने अभिनयापेक्षा पडद्यामागे राहत या क्षेत्राशी आपली नाळ जोडली. दिग्दर्शनात तिने अधिक रस घेतला. काही चित्रपटांचे दिग्दर्शनही सौंदर्याने केले आहे. ११ फेब्रुवारीला सौंदर्या आणि विशागन यांचा विवाहसोबळा पार पडणार आहे. ९ फेब्रुवारीपासून मेहंदी, संगीत अशा कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.
