ठाकरेमधील नवाजुद्दीनने साकारलेल्या भूमिकेचे रोहित शेट्टीने केले कौतुक

rohit-shetty
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला असून याआधी मुंबईमध्ये चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. रोहितने स्क्रीनिंगनंतर चित्रपटातील नवाजुद्दीनने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

नवाजुद्दीन एक उत्तम अभिनेता असून प्रेक्षक त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर हेच बोलतात, असे म्हणत रोहितने त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. यासोबतच नवाजने बाळासाहेबांच्या तरूणपणातील भूमिकेसाठी केलेला अभिनय खरंच बाळासाहेब समोर असल्याचा आभास करून देणारा असल्याचेही रोहित शेट्टीने म्हटले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री अमृता रावने बाळासाहेबांची पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली आहे.

Leave a Comment