
मध्य प्रदेशात काँग्रेसकडून अभिनेत्री करिना कपूर लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या बातम्यांनंतर आता लोकसभा निवडणूकीत बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. सलमानला इंदौर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते राकेश यादव यांनी केली आहे.
आता सलमान खान देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?
तरुणाईमध्ये सलमान खानची प्रचंड क्रेझ असल्यामुळे इंदौर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्याला दिली, तर इंदौरच्या तरुणांना फिल्म इंडस्ट्रीचा फायदा मिळेल, असे काँग्रेस नेते राकेश यादव यांचे म्हणणे आहे. इंदौरमध्ये सलमानने खूप वेळ घालवला आहे. त्याचा नेहमी इंदौरला दौरा असतो. तसेच बऱ्याचदा काँग्रेसचा प्रचार करताना सलमानला पाहिले आहे. सलमानची याआधी एक मुलाखत व्हायरल झाली होती. सलमान ज्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांची प्रशंसा करत होता. मी जर छिंदवाडाचा असतो तर कमलनाथ यांना मतदान केले असते, असे सलमान म्हणाला होता.
