२ पेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांच्या सरकारी सुविधा काढून घ्या – बाबा रामदेव

ramdev-baba
नवी दिल्ली – योगगुरु बाबा रामदेव यांनी २ अपत्यांपेक्षा जास्त अपत्ये ज्यांना आहेत, अशा लोकांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात यावा. तसेच त्यांच्या निवडणूक लढविण्यावर देखील बंदी घातली पाहिजे, असे म्हटले आहे.

बाबा रामदेव म्हणाले, २ पेक्षा जास्त अपत्ये ज्या लोकांना आहेत अशांना सरकारी शाळा, रुग्णालयांचा वापर करू देऊ नये. तसेच त्यांना सरकारी नोकरीही देण्यात येऊ नये. यामुळे लोकसंख्या नियंत्रणात राहिल. भाजप नेते गुलाबचंद कटारिया यांनी काही दिवसांपूर्वीच मुस्लिमांच्या अपत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. मुस्लिमांनी स्वत:ला २ अपत्यांपर्यंतच मर्यादित करून घ्यावे, असे कटारिया म्हणाले होते. यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली होती.

Leave a Comment