पियुष गोयल सादर करणार देशाचा अर्थसंकल्प !

budget
नवी दिल्ली – सध्या वैद्यकीय उपचारांसाठी अर्थमंत्री अरुण जेटली अमेरिकेला गेले असून रेल्वे मंत्री पियूष गोयल त्यांच्या अनुपस्थितीत अर्थमंत्रालय आणि कॉर्पोरेट घडामोडींचा अतिरिक्त भार सांभाळणार आहेत. त्यांच्याकडे ही जबाबदारी राष्ट्रपती भवनाकडून आलेल्या सरकारी परिपत्रकाद्वारे तातडीने देण्यात आली आहे. गोयल यांच्याकडे आधीच्या खात्यांसह हा कार्यभार तात्पुरत्या काळासाठी देण्यात आला आहे.

दरम्यान, अरुण जेटली हे मंत्रीपदावर असले तरी, त्यांच्याकडे कार्यभार राहणार नाही (मिनिस्टर विदाऊट पोर्टफोलिओ). देशाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार असे निर्देश दिले आहेत की, अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट घडामोडी मंत्रालयाचे मंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत पियूष गोयल यांच्याकडे या मंत्रालयांचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता सोपवण्यात येत असल्याचे सरकारी परिपत्रकात म्हटले आहे.

या कालावधीत तसेच, गोयल जेटली पुन्हा कार्यभार स्वीकारेपर्यंत त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळतील. गोयल यांच्याकडे या कालावधीत आधी असलेल्या खात्यांच्या जबाबदाऱ्याही तशाच राहतील. या नव्या जबाबदारीमुळे गोयल यंदाचा अर्थसंकल्पही सादर करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment