
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी ‘रोमियो अकबर वाल्टर’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या दिवशी प्रदर्शित होणार जॉनचा ‘रोमियो अकबर वाल्टर’
या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल यांनी केले असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ट्विटरवर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केली आहे. हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. जॉनसोबत या चित्रपटात मौनी रॉय, जॅकी श्रॉफ, सुचित्रा कृष्णमुर्ती आणि सिकंदर खेर हे कलाकार झळकणार असून या चित्रपटाची निर्मिती ‘व्हिकॉम मोशन पिक्चर्स’, ‘केवायटीए’ आणि ‘व्हिए फिल्म्स’ यांनी केली आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगला मागच्या वर्षी जून महिन्यात सुरुवात झाली होती. या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर महिन्यात पूर्ण झाले. जॉन या चित्रपटात १८ वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसणार आहे. तब्बल ८० ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. हा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित आहे. यातील सर्व स्टंट जॉनने स्वत:च केले आहेत.
