रणवीरने शेअर केले ‘८३’चे पहिले पोस्टर

ranveer-singh
बॉलिवूडमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका अभिनेता रणवीर सिंहने साकारल्या आहेत. त्याने ऐतिहासिक, रोमॅन्टिक, धाडसी, विलन, बिनधास्त अशा विविधांगी भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो लवकरच क्रिकेटवर आधारित ८३ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट १९८३मध्ये झालेल्या ‘विश्वचषका’वर आधारित आहे. तो यात कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. रणवीरचा खास लूक यात पाहायला मिळत आहे.


कबीर खान हे ‘८३’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. दीपिका पादुकोणचीही भूमिका या चित्रपटात राहणार असल्याचे बोलले जात होते. पण दीपिकाने यावर कोणतेही शिक्कामोर्तब केला नाही. रणवीरने एका माध्यमाच्या मुलाखतीत या चित्रपटाबद्दल सांगितले होते, की ‘कपिल देव यांची भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी फार मोठी संधी आहे. त्याचे क्रिकेटमधील योगदान हे अमुल्य आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची संधी मिळणार आहे, असेही त्याने म्हटले आहे.

Leave a Comment