
कोलकाता – अभिनेते नसरुद्दीन शहा यांच्या देशात सुरक्षितता नाही, या वक्तव्याचे नोबेल पारितोषिक विजेते आणि अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी समर्थन केले असून त्यांनी कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना नसरुद्दीन शहा यांच्या वक्तव्यावर आपले मत मांडले.
नोबेल विजेते अमर्त्य सेन यांच्याकडून नसरुद्दीन शहांची पाठराखण
नसरुद्दीन शहा यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो. देशामध्ये सध्याच्या घडीला भीतीचे आणि असहिष्णुतेचे वातावरण आहे. एका मजबूत लोकशाही प्रधान देशामध्ये असहिष्णुता ही सर्वात शेवटची स्वीकार्य गोष्ट असते. त्यानंतर राज्यकर्त्यांना उधळून लावण्यात येते, असे मत अमर्त्य सेन यावेळी व्यक्त केले.
सेन आगामी लोकसभा निवडणुकांवर बोलताना म्हणाले, की निवडणुकांना सध्या खुप कमी कालावधी उरला आहे. पण जनता कोणत्या बाजूला मतदान करणार हे वेळच सांगेल, अशी प्रतिक्रिया सेन यांनी दिली आहे. त्यांनी बुलंदशहर येथील पोलीस अधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणीही दुःख व्यक्त केले.
