इथिओपिया ८ वर्षे जगाच्या मागे असलेला देश

calender
साधारण जगभरात नवे वर्ष १ जानेवारी पासून सुरु होते. ग्रीगोरीयन कॅलेंडर वापरणारे सर्व देश एकाचवेळी नवीन वर्ष साजरे करतात आणि सध्या २०१९ वर्ष सुरु झाले आहे. मात्र जगापेक्षा ८ वर्षे मागे असलेला एक देश आहे त्याचे नाव इथिओपिया. या देशात आत्ता २०११ हे साल सुरु झाले आहे. १० कोटी लोकसंख्या असलेल्या इथिओपियात नवीन वर्षाची सुरवात ११ सप्टेंबरला होते.

या देशाचे स्वतःचे कॉप्टिक कॅलेंडर आहे. त्यानुसार तेथे कालगणना केली जाते. त्यांचे सणउत्सव याच कालगणनेप्रमाणे साजरे होतात. बाकी जगभरात हे उत्सव ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे साजरे होतात. इथिओपिया या देशात मसीहाचा जन्म ७ बीसी मध्ये झाला असे मानले जाते. त्यानुसार तेथे कालगणना सुरु झाली असे सांगतात. वरील चित्रात दिसते आहे ते त्यांचे कॅलेंडर आहे. ७ बीसी पासून कालगणना सुरु झाल्याने हा देश बाकी जगापेक्षा ८ वर्षे मागे आहे.

Leave a Comment