मलेशियाच्या राजाने दिला राजीनामा

malyaisia
मलेशियाचा राजा सुलतान मोहम्मद पंचम यांनी रविवारी राजापदाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मलेशियाच्या इतिहासात राजाने त्याचा पदाचा राजीनामा देण्याची घटना प्रथमच नोंदली गेली आहे. राजाने का राजीनामा दिला यासंदर्भात अनेक अफवा उठल्या असून त्यात राजाला रशियाच्या माजी ब्युटीक्वीनशी विवाह करायचा असल्याने त्याने पद सोडल्याची चर्चा जोरात सुरु आहे.

४९ वर्षीय सुलतान मोहम्मद गेल्या नोव्हेंबरपासून दोन महिने आजारपणाच्या रजेवर आहेत. तेव्हापासून त्यांच्याबद्दल अनेक अफवा उठत आहेत. रशियन सौंदर्यवती बरोबर विवाह करता यावा म्हणून त्यांनी राजगादीच्या त्याग केल्याचे चर्चेत आहे. १९५७ मध्ये या देशाला ब्रिटीशांच्या जोखडातून स्वातंत्र मिळाले. तेव्हापासून राजाने राजीनामा देण्याची हि पहिलीच वेळ आहे. रॉयल हाउसहोल्डचे प्रवक्ते वान अहमद दह्लन अब्दुल अजीज यांनी राजाने पदत्याग केल्याची घोषणा केल्याचे जाहीर केले त्याचबरोबर राजाने मलेशियन जनतेने एकता, सहनशीलता आणि एकत्रितपाने काम करण्यासाठी वचनबद्ध राहावे असा संदेश दिल्याचीही जाहीर केले आहे.

मलेशियात दर पाच वर्षांनी नवीन राजा निवडला जातो. सध्याचे सुलतान मोहम्मद पंचम २०१६ साली गादीवर आले होते.

Leave a Comment