
मराठी चित्रपटाला थिएटर मिळवण्यासाठी सध्याच्या घडीला बराच संघर्ष करावा लागत आहे. सिम्बा आणि भाई यांचा वाद ताजा असताना मराठी मनाला सुखावणारी बाब घडली आहे. अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘ठाकरे’ चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या शौमिक सेन दिग्दर्शित ‘चिट इंडिया’ चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. ही घोषणा आज संध्याकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे.
‘ठाकरे’साठी कंगना आणि इम्रान हाश्मीने घेतले नमते !
‘चिट इंडिया’ची ही पत्रकार परिषद असली तरी त्या व्यासपीठावर खासदार व ठाकरे चित्रपटाचे निर्माते संजय राऊत व आदित्य ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. ही अधिकृत घोषणा याच कार्यक्रमात होईल. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ‘ठाकरे’ चित्रपटाबाबत असलेली उत्सुकता पाहता बहुचर्चित मणिकर्णिका हा चित्रपटही आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ‘ठाकरे’ हा 25 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होत आहे. कंगना राणावतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ आणि ‘चिट इंडिया’ हे दोन चित्रपट याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. मात्र ‘ठाकरे’साठी ‘चिट इंडिया’ चित्रपटाची तारीख पुढे ढकलली असून ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
