
वॉशिंग्टन – सुवर्णमंदिराचे चित्र असलेल्या पायपुसणी, चादरी आणि स्वच्छतालयातील वस्तू अॅमेझॉनवर ऑनलाईन विक्रीकरिता ठेवल्या आहेत. अॅमेझॉनने या प्रकारामुळे शीख समाजाच्या भावनांचा अनादर केल्या असून जगभरातील शीख समाज संतप्त झाले आहेत. शीख समाजाने अॅमेझॉनकडे समाजाचा अवमान करणारी उत्पादने काढून टाकावी, अशी मागणी केली आहे.
अॅमेझॉनवर सुवर्णमंदिराचे चित्र असलेल्या पायपुसणी, चादरीची विक्री
अमेरिकेतील नागरी हक्क संघटनेने अॅमेझॉनशी तत्काळ संपर्क साधून आक्षेपार्ह उत्पादने काढून टाकण्याची मागणी केल्याचे म्हटले आहे. सुवर्णमंदिर ही पायपुसणी नाही, असेही त्यांनी ट्विट केले आहे. अवमान करणारी उत्पादने अॅमेझॉनच्या सीईओंनी काढून टाकावीत, अशी मागणी शीख समाजाच्या एनजीओने केली आहे. त्याबाबत अनेक सदस्यांच्या तक्रारी आल्याचे एनजीओने म्हटले आहे.
अॅमेझॉन वेबसाईटवरुन काही उत्पादने काढून टाकण्यात आली आहेत. पण, स्वच्छतागृहातील उत्पादने अजून ई-कॉमर्स वेबसाईटवरुन काढण्यात आली नाहीत. याबाबत युनाटेड शीख्सचे व्यवस्थापक राजेश सिंग म्हणाले की, अशी उत्पादन अॅमेझॉन विकत असल्याचे धक्कादायक आणि खूप निराशाजनक आहे. अॅमेझॉन व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दरबार साहिबांचा अवमान करणारी उत्पादने विक्री ठेवून अज्ञान दाखविले आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ‘शीख जागृती प्रशिक्षण’ अॅमेझॉन कर्मचाऱ्यांना देण्याची त्यांनी ऑफर अॅमेझॉनला दिली आहे. शीख समाजाचा अवमान करणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन त्वरीत थांबवावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. यापूर्वी अॅमेझॉनवर भारतीय ध्वजाचा अवमान करणाऱ्या उत्पादनांची विक्री झाल्याचा प्रकारही घडला होता.
