फसवणूक प्रकरणी गौतम गंभीर विरोधात निघाले वॉरंट

gautam-gambhir
नवी दिल्ली – रुद्र बिल्डवेल प्रायवेट लिमिटेड कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरवर फ्लॅट मालकांनी फसवणुकीचा आरोप केला असून त्यानुसार गौतम गंभीरविरोधात अटक वॉरंट निघाले आहे. २४ तारखेपर्यंत त्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गंभीरला दिल्लीतील साकेत न्यायालयाने वारंवार समन्स बजावले होते. पण तरीही गंभीर न्यायालयात हजर झाला नव्हता. मागील सुनावणीवेळीही गंभीर अनुपस्थित होता. दिल्ली आणि एनसीआरमध्ये रुद्र बिल्डवेल कंपनीचे प्रोजेक्ट आहेत. ग्राहकांनी कंपनीवर पैसे घेवून फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे. कंपनीने गौतम गंभीरच्या नावाने पैसे घेवून फ्लॅट दिला नाही, असे आरोप फ्लॅटधारकांनी करत आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यावर आर्थिक गुन्हे विभागाने मुकेश खुराना याच्याविरोधातही याचिका दाखल करुन घेतली होती.

Leave a Comment