माद्रिद – दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने ‘सीरि ए’ स्पर्धेत जुव्हेंटस आणि फिओरेंटीना क्लबमध्ये झालेल्या एका सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जुव्हेंटस फिओरेंटीनावर या सामन्यात ३-० ने मोठा विजय मिळवला असून यात एक गोल करण्यात रोनाल्डोला यश आले.
🔥 @Cristiano becomes the first debut-season Bianconero to net 1️⃣0️⃣ @SerieA goals after 14 games since the great John Charles in 1957/58 ⚽️#ForzaJuve #CR7JUVE pic.twitter.com/jy5Pv2BW4c
— JuventusFC (@juventusfcen) December 1, 2018
रोनाल्डोने या सामन्यात गोल करताच दिग्गज फुटबॉलपटू जॉन चार्लस यांच्या युव्हेंटसकडून १४ सामन्यात १० गोल करण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. रोनाल्डोच्या नावावर या सामन्याआधी ९ गोल जमा होते. रोनाल्डो युव्हेंटसकडून खेळताना अशी कामगिरी करणारा हा दुसराच खेळाडू आहे.
जुलैमध्ये इटलीच्या युव्हेंट्स क्लबशी रोनाल्डोने ८८ मिलियन पौंडमध्ये करार केला. रोनाल्डो याआधी २००९ मध्ये ८० मिलियन पाउंडच्या किंमतीवर रियाल माद्रिदशी जोडला गेला होता. त्यानंतर तब्बल ९ वर्षानंतर रोनाल्डोने रियाल माद्रिद संघाची साथ सोडली.