हॉर्लिक्सची ३१ हजार ७०० कोटी रुपयांना विक्री

horlicks
मुंबई – ग्राहकोपयोगी उत्पादन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘हॉर्लिक्स’ची विक्री करण्यात आली असून हॉर्लिक्सची खरेदी ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ कंपनीने केली आहे. ‘ग्लॅक्सोस्मिथक्लाइन’ (जीएसके) कंपनी हॉर्लिक्स हे उत्पादन बनवत होती. हा करार तब्बल ३१ हजार ७०० कोटी रुपयांना करण्यात आला असून देशातील ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रामधील हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा करार मानण्यात येत आहे.

याबाबत माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, जीएसके कंपनीच्या एका समभागाच्या बदल्यात हिंदुस्थान युनिलिव्हरच्या ४.३९ एवढा समभाग, ह्या आधारावर हा करार करण्यात आला. मानवी पोषण (न्यूट्रीशन) उद्योगातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (जीएसके) कंपनीने घेतला. ह्या करारानंतर सेंसोडाईन, ओरल केअर ब्रँड, ईनो, क्रोसीन या उत्पादनांच्या विक्रीचा अधिकार आता हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीला मिळाला आहे.

तर दुसरीकडे हॉर्लिक्स ब्रॅण्डची विक्री ब्रिटनमध्ये चालूच राहणार आहे. या करारात ब्रिटनमधील हॉर्लिक्स ब्रँण्डचा सामावेश करण्यात आला आहे. एक ऐतिहासिक संदर्भ देखील हॉर्लिक्स ब्रँण्डला आहे. पहिल्या महायुध्दा दरम्यान हा ब्रँण्ड बाजारात आला होता. ब्रिटिशांतर्फे लढणाऱ्या भारतीय सैनिकांना त्यावेळी पूरक आहार (एनर्जी सप्लीमेंट) म्हणून हॉर्लिक्स दिले जायचे.

Leave a Comment