
भारतीय ई-कॉमर्स कंपन्यांकडून आगामी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सेल जाहीर केले आहेत. यामध्येच आजपासून अॅमेझॉनच्या फ्रिडम सेलला सुरूवात झाली आहे. आजपासून सुरू झालेला हा सेल पुढील तीन दिवस म्हणजे १२ ऑगस्टपर्यंत असणार आहे. अनेक प्रोडक्ट्सवर यामध्ये आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
अॅमेझॉनचा फ्रिडम सेल आजपासून सुरू
डिस्काऊंट, एक्सचेंज आणि कॅशबॅकच्या माध्यमातून या तीन दिवसांमध्ये अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. यामधील एक ऑफर म्हणजे तीन हजारांवरच्या खरेदीवर एसबीआयच्या कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच कमाल १५०० रुपयांचा कॅशबॅकही देण्यात येणार आहे. तर, अॅमेझॉन पे या पेमेंट सिस्टीमचा वापर करुन खरेदी करणाऱ्यांना ५ टक्क्याचा कॅशबॅक मिळेल.
