६ वर्षांचा रेयान हा खेळण्यांमुळे कोट्यधीश झाला हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण आता रेयानला जगातील प्रसिद्ध रिटेल कंपनी वॉलमार्टणे ब्रॅण्ड केले आहे. मागच्या वर्षी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केल्यामुळे रेयान नावाच्या या मुलाची ११ मिलियन डॉलर कमाई झाली आहे. रेयानचे यूट्यूबवर ६ चॅनल आहेत. जवळपास १.५ कोटींपेक्षा जास्त जणांनी या चॅनलवरच्या व्हिडिओंना बघितले आहे. हा मुलगा मागच्या वर्षी यूट्यूबवर आठवा सर्वाधिक कमाई करणारा ठरला. तर यूट्यूबवर एवढी कमाई करणारा तो सगळ्यात लहान कोट्यधीश आहे.
यूट्यूबवर ६ वर्षांचा रेयान खेळण्यांचा रिव्ह्यू करतो. वॉलमार्टने आता रेयानसोबत करार केला आहे. वॉलमार्ट या करारानुसार अमेरिकेमध्ये त्यांच्या २५०० स्टोअर्समध्ये रेयानच्या ब्रॅण्डची खेळणी विकणार आहे. या ब्रॅण्डला वॉलमार्टने रायन वर्ल्ड असे नाव दिले आहे. ३ वर्षांचा असल्यापासून रेयान यूट्यूबवर खेळण्यांचा रिव्ह्यू करतो. प्रत्येक खेळण्याला बघून त्याला वापरून आणि समजून रेयान या खेळण्याबद्दल छोट्यात छोटी माहिती देतो.