शास्त्रज्ञांनी बनविला पॉपकॉर्नच्या उर्जेवर चालणारा रोबोट


अमेरिक शास्त्रज्ञांनी पॉपकॉर्नच्या उर्जेवर चालणारा रोबोट बनविला आहे. मात्र हा रोबोट केवळ एकदाच वापरता येऊ शकणार आहे.

पॉपकॉर्नचा दाणा गरम केला असता तो दहापट मोठा होतो. मोठ्या होण्याची या प्रक्रियेसाठी जी ऊर्जा वापरण्यात येते त्यातून हा रोबोट चालवता येणार आहे. त्यामुळे रोबोट बनविण्याचा खर्च अत्यंत कमी होणार आहे. तसेच अशा प्रकारचे छोटे उपकरण तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या कलेक्टिव्ह एम्बॉडीड इंटेलिजन्स लॅबमधील संशोधकांनी हा शोध लावला आहे. नुकत्याच झालेल्या आयईईई इंटरनॅशनल कॉनफरन्स ऑन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या परिषदेत त्यांनी या विषयावरील प्रबंध सादर केला.

“आम्हाला बऱ्याच काळापासून कमी खर्चात बनणारा आणि अधिक काम करू शकणारा असा रोबोट बनवण्याची इच्छा होती. रोबोटला उर्जा पुरविण्यासाठी पॉपकॉर्न चा उपयोग पहिल्यांदाच झाला आहे. ही अत्यंत सोपी आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे,” असे या प्रयोगातील संशोधक असलेले प्रोफेसर एच. पिटरसन यांनी सांगितले.

पॉप कॉन ज्याप्रमाणे खाता येतो त्याचप्रमाणे हे उपकरण वैद्यकीय प्रक्रियेदरम्यान शरीरात प्रविष्ट करता येते. पॉपकॉर्नचा दाणा एकदा मोठा झाल्यानंतर परत बारीक होऊ शकत नाही. त्यामुळेच या उपकरणाचा उपयोग केवळ एकदा केल्या जाऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

Leave a Comment