
स्मार्टफोन बाजारात भक्कम पाय रोवल्यानंतर चीनी कंपनी शाओमीने आता फिचर फोन लाँच केला आहे. क्यूआयएन एआय ४ जी व्होल्ट या नावाने हा फोन बाजारात आला आहे. फिचर फोनचा बाजार पुन्हा उसळी घेण्याच्या तयारीत असतानाच शाओमीने हा फोन बाजारात उतरविला आहे. या फोनला काही खास फिचर दिली गेली आहेत.
शाओमीने बाजारात आणला फिचर फोन
या फोनला रिअल टाईम ट्रान्सले फिचर दिले गेले असून हा फोन १७ भाषा सपोर्ट करतो. ४ जी व्होल्ट बरोबरच या फोनला अँड्राईड ओएस असून हे कस्टमाईज व्हर्जन मुकोर ५० एस अश्या नावाने दिले गेले आहे. या फोनला एआय फिचर आहे त्यामुळे युजरला प्रश्नांची उत्तरे मिळतील तसेच लहान मुलांना रात्री झोपताना सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी ऐकता येतील. फोनचे डिझाईन कॅन्डी बार प्रमाणे आहे. त्याला टी ४ की बोर्ड दिला गेला आहे.
या फोनला २.८ इंची डिस्प्ले, २५६ एमबी रॅम, ५१२ एमबी मेमरी दिली असून हायब्रीड सीम स्लॉट आहे. म्हणजे युजर दोन सीम वापरणार नसेल तर मायक्रो एसडी कार्डचा वापर करता येणार आहे. या फोनला कॅमेरा नाही पण इन्फ्रारेड सेन्सर आहे. त्यामुळे टीव्ही पासून ते एसी पर्यंत सर्व उपकरणे कंट्रोल करता येणार आहेत. या फोनची किंमत १९९ युआन म्हणजे १९९९ रु. असून तो जिओ फोनला जोरदार टक्कर देईल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
