त्रियुगी नारायण मंदिरात आकाश श्लोका घेणार सात फेरे?


देशातील बडे उद्योजक मुकेश अंबानी याचे पुत्र आकाश आणि रसेल मेहता यांची कन्या श्लोका यांच्या विवाहाचे काही विधी उत्तराखंड मधील प्रसिद्ध त्रियुगी नारायण मंदिरात केले जाणार असल्याचे समजते. रुद्रप्रयाग येथे असलेल्या या प्राचीन मंदिरात खुद्द शिव पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे. त्या विवाहावेळी चेताविलेला होम आजही प्रज्वलित असून येथे अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.


मिळालेल्या माहितीनुसार आकाश श्लोका यांचा जयमाला विधी येथे संपन्न होईल. या मंदिरात विवाह करणाऱ्याला अखंड सौभाग्य मिळतेच पण त्याचे वैवाहिक जीवन सुखाचे, समाधानाचे आणि भ्रभ्रतातीचे जाते असा विश्वास आहे. आदिमाता पार्वती आणि देवांचे देव शिव यांचे हे विवाहस्थळ. यात पार्वतीचे भाऊ म्हणून खुद्द विष्णू हजर होते आणि पुरोहिताचे काम ब्रह्मदेवाने बजावले होते असा समज आहे. हे मंदिर विष्णू आणि लक्ष्मी यांना समर्पित आहे. शिव पार्वती विवाह लावण्यापूर्वी भावाने करावायचे विधी करण्याअगोदर विष्णूने जेथे स्नान केले ते कुंड आजही अस्तिवात आहे तसेच विवाहासाठी प्रज्वलित केलेला होम अजूनही प्रज्वलित आहे. येथे भाविक समिधा अर्पण करतात आणि येथील भस्म प्रसाद म्हणून नेतात आणि शुभकार्यात त्याचा टिळा लावला जातो.

या यज्ञ कुंडाजवळ एक स्तंभ असून शिवाला लग्नात दिली गेलेली गाय येथे बांधली जात होती असेही सांगितले जाते. या मंदिरात अनेक विवाह होतात. रिलायंसचे काही अधिकारी येथे नुकतीच एक दिवस भेट देऊन पाहणी करून गेले असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment